Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे कोर्टानं फेटाळला

Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे कोर्टानं फेटाळला

| Updated on: May 26, 2022 | 8:32 PM

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेचा जेल मुक्काम आणखी वाढला आहे. कारण कोर्टाने तिचा आजही जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यात तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जवाब येणे बाकी आहे. सध्या केतकी चितळे ही ठाणे न्यायालयीन कोठडीत म्हणजे ठाणे कारागृहात आहे.

Published on: May 26, 2022 08:32 PM
Brij Bhushan Singh समोर यूपीवाल्यांची महाराष्ट्राला खुली धमकी!
Special Report | 13 तास ईडीकडून चौकशी, Anil Parab यांचं काय होणार?-TV9