अभिनेत्री निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला

अभिनेत्री निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला

| Updated on: Dec 01, 2021 | 12:32 PM

कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री निकीता दत्तासोबत (Actress Nikita Dutta) एक भयावह घटना घडली आहे. वांद्रे (Bandra) येथे तिचा फोन (Phone Snatched) काही मोबाईल चोरट्यांनी पळवला. 

मुंबई : कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री निकीता दत्तासोबत (Actress Nikita Dutta) एक भयावह घटना घडली आहे. वांद्रे (Bandra) येथे तिचा फोन (Phone Snatched) काही मोबाईल चोरट्यांनी पळवला.  याबाबत अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीये. तिच्या हातातून तिचा फोन हिसकावून हे चोरटे बाईकवरुन फरार झाल्याचं तिने सांगितलं. या घटनेने निकीता पुरती हादरली आहे. ती अद्यापही या धक्क्यातून सावरलेली नाही.

Published on: Dec 01, 2021 12:32 PM