Special Report | स्वरा भास्करची चिथावणी, हिंदुत्वाची तुलना तालिबानशी!
एकीकडे तालिबान्यांच्या कृत्याचा जगभरातून निषेध केला जातोय. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या एका ट्विटने चिथावणी देण्याचं काम केलं आहे. कारण स्वराने तालिबानची तुलना थेट हिंदुत्वाशी केली आहे.
अफगाणिस्तानात तालिबान्यांचे दिवसाढवळ्या तालिबान्यांचे अत्याचार सुरु आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर थेट गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एकीकडे तालिबान्यांच्या कृत्याचा जगभरातून निषेध केला जातोय. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या एका ट्विटने चिथावणी देण्याचं काम केलं आहे. कारण स्वराने तालिबानची तुलना थेट हिंदुत्वाशी केली. त्यामुळे ट्विटरवर स्वराच्या अटकेच्या मागणीने जोर घेतला आहे. ट्विटरवर याबाबच्या मागणीसाठी हॅशटॅग ट्रेंड होतोय.
Published on: Aug 18, 2021 09:21 PM
Latest Videos