Aaditya Thackeray | जेव्हा पोस्ट कोविड दिसेल, तेव्हा महाराष्ट्र पर्यटनात अग्रेसर असेल : आदित्य ठाकरे
स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग यासारख्या खेळांना नोंदणीनंतर परवानगी मिळणार आहे. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी आणि निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल.
मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणासाठी (Maharashtra tourism policy 2021) जंगी प्लॅनिंग केल्याचं दिसतंय. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग यासारख्या खेळांना नोंदणीनंतर परवानगी मिळणार आहे. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी आणि निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल. या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि आवश्यक सर्व अहर्ता प्राप्त केल्यानंतर, अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.
Latest Videos