'...त्यांचं चारित्र्य हनन होतंय', नितेश राणे यांच्या 'त्या' आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

‘…त्यांचं चारित्र्य हनन होतंय’, नितेश राणे यांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार

| Updated on: Dec 10, 2023 | 4:56 PM

दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमली जाईल म्हणून आदित्य ठाकरे दुबईला पळून गेले, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी केला होता. यावर आदित्य ठाकरे यांचा पलटवार म्हणाले, भाजपला ज्यांची भीती वाटते त्यांचं चारित्र्य हनन केलं जातं. प्रत्येक अधिवेशनादरम्यान असंच वातावरण तयार केलं जातंय

मुंबई, १० डिसेंबर २०२३ : भाजपला ज्यांची भीती वाटते त्यांचं चारित्र्य हनन केलं जातं. प्रत्येक अधिवेशनादरम्यान असंच वातावरण तयार केलं जातं. तर जे जे सत्यासाठी लढचाय त्यांना सतावलं जातंय, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. दरम्यान, दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमली जाईल म्हणून आदित्य ठाकरे दुबईला पळून गेले, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी केला होता. अधिवेशनातही आदित्य ठाकरे कुठेही सभागृहात दिसत नाही, याचा अर्थ असाही होऊ शकतो की आदित्य ठाकरे देश सोडून परदेशात पळून गेले आहे. म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

Published on: Dec 10, 2023 04:56 PM