राज्यात गुंडाचं सरकार अन्... , आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

राज्यात गुंडाचं सरकार अन्… , आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

| Updated on: Feb 23, 2023 | 9:41 PM

VIDEO | कसबा पेठ मतदारसंघात प्रचारादरम्यान आदित्य ठाकरे यांनी केला शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

पुणे : कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार उभा केल्याने पोटनिवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे या पोटनिवडणुकीच्या लढतीत सहभागी होऊन जोरदार प्रचार या नेत्याचा सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर प्रचारादरम्यान जोरदान टीका केली. यावेळी त्यांनी ५० खोके एकदम ओक्केवर देखील भाष्य करत निशाणा साधला तर राज्यात गुंडांचं सरकार आहे. सध्याचं सरकार हे गद्दार यांचं सरकार घालवून आम्ही लवकरच कायद्याचं सरकार आणू तसेच संविधान मानणारं सरकार आणू, असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

Published on: Feb 23, 2023 09:39 PM