‘सरकारला फक्त पालकमंत्री कोण? याच्यावरून भांडण करायचं वेळ’; शिवसेना नेत्याचं टीकास्त्र

‘सरकारला फक्त पालकमंत्री कोण? याच्यावरून भांडण करायचं वेळ’; शिवसेना नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Aug 13, 2023 | 3:00 PM

तर यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तर शिंदे किती आराम करत आहेत? ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्याने आपण राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झालो आहोत की आराम करायला याचा विचार करायला हवा, असा टोला राऊत यांनी लगावलाय.

मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | राज्यातील गृहविभागातील पोलिस दलास यावेळी केंद्रीय गृह विभागाचे एक देखील पदक मिळालेलं नाही. यावरून सरकारवर टीका होत आहे. तर यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तर शिंदे किती आराम करत आहेत? ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्याने आपण राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झाला आहोत की आराम करायला याचा विचार करायला हवा, असा टोला राऊत यांनी लगावलाय. त्यानंतर आता याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर निशाना साधला आहे. मुंबई-गोवा मार्गाबाबत किती वर्षापासून आंदोलन सुरू आहे. मात्र यांना आज पालकमंत्री कोण? कुठला बनणार? याच्यावरून भांडण करायचं वेळ असल्याची टीका केलीय तर सर्वात मोठा एक अजून तपास अजून व्हायचं असून या तिघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? हे पाहावं लागेल अशी खोचक टीका केली आहे.

Published on: Aug 13, 2023 02:59 PM