Aditya Thackeray : समोर बसलेले गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा

Aditya Thackeray : समोर बसलेले गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा

| Updated on: Jul 22, 2022 | 10:24 PM

त्यांनी आपलं इमान का विकलं? आम्ही नक्की चुकीचं काय केलं? सगळं काही ठीक चाललं होतं, महाराष्ट्र पुढे चालला होता, अनेक विकासकामं सुरु होती. कोविडचा काळ नीट हाताळला आपण, असही आदित्य ठाकरे म्हणाले.

सगळं काही ठीक सुरु असताना गद्दारी करण्याची गरज काय पडली? नेमकं असं काय घडलं? हे बेकायदेशीर सरकार कोसळणार आहे. पण हे सगळं होत असताना विधानसभेत माझ्यासोबत 15 आमदार होते. आम्ही सगळे सोबत बसलेलो. तेव्हा तात्पुरते समोर ते बसले होते. जेव्हा ते समोर बसलेले आम्ही स्वाभिमानाने त्यांच्याकडे पाहत होतो आणि समोर बसलेले गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे आता फाटले आहेत. आतापर्यंत सांगत होते की ठाकरे आणि शिवसेनेबाबत आदर आहे, पण काल आणि आज बघा त्यांची वक्तव्य समोर येत आहेत. आता ते धमक्या द्यायला लागले आहेत. त्यांनी आपलं इमान का विकलं? आम्ही नक्की चुकीचं काय केलं? सगळं काही ठीक चाललं होतं, महाराष्ट्र पुढे चालला होता, अनेक विकासकामं सुरु होती. कोविडचा काळ नीट हाताळला आपण, असही आदित्य ठाकरे म्हणाले.