आता आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री ! कुठं झळकले बॅनर्स?
VIDEO | आता आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे अन् चर्चांना उधाण, कुणी कुठं केली बॅनरबाजी?
नागपूर : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. औष्णिक वीज प्रकल्प आणि कोसळा उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत त्यांचा हा दौरा असणार आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेचे तज्ज्ञ दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. या दौऱ्यात कोराडी वीज प्रकल्प परिसरातील प्रदूषित गावांना आदित्य ठाकरे हे भेट देणार आहेत. तसेच नांदगाव, वराडा गावालाही भेट देत आदित्य ठाकरे गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ लिना बुद्धे देखील असणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे या नागपूरच्या दौऱ्यावर असल्याने नागपूरमध्ये वेगळीच चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांचे नागपुरात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या रामटेक येथे हे बॅनर्स ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. तर रामटेकमध्ये आदित्य ठाकरे यांचीच चर्चा असल्याचे दिसतंय.