Video | मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर बॅनरबाजी, आयुक्तांनी मनाई केलेली असतानाही बॅनरबाजी

Video | मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर बॅनरबाजी, आयुक्तांनी मनाई केलेली असतानाही बॅनरबाजी

| Updated on: Jun 15, 2021 | 5:38 PM

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विर्लेपार्ले येथे एका लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले आहे. मात्र, या उद्घाटनाआधीच इथे बॅनरबाजीचा वाद रंगला होता. लसीकरण केंद्राबाहेर आदित्य ठाकरे यांच्या नावाची बॅनरबाजी करण्यात आली होती.

मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विर्लेपार्ले येथे एका लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले आहे. मात्र, या उद्घाटनाआधीच इथे बॅनरबाजी करण्यात आली. लसीकरण केंद्राबाहेर आदित्य ठाकरे यांच्या नावाची बॅनरबाजी करण्यात आली होती. लसीकरण केंद्राबाहेर बॅनर, होर्डिंग्स लावू नये अशी तंबी मनपा आयुक्तांनी कालच दिली होती. तरीदेखील पार्लेश्वर हॉलबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. याच करणामुळे येथे बॅनरबाजीचा वाद रंगला.