मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट अन्… आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर काय केला गंभीर आरोप?
'मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट महालक्ष्मी, वरळी येथील रेसकोर्स ताब्यात घेऊ इच्छित आहे. असं मला ऐकायला मिळतंय. शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न', महालक्ष्मी रेसकोर्स येथील जागा सरकार बळकावतंय. इतकंच नाहीतर सरकार ही जागा बळकावून कंत्राटदाराला देतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलाय.
मुंबई, २ जानेवारी २०२४ : महालक्ष्मी रेसकोर्स येथील जागा सरकार बळकावतंय. इतकंच नाहीतर सरकार ही जागा बळकावून कंत्राटदाराला देतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलाय. यासह शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ट्वीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केलाय. ‘मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट महालक्ष्मी, वरळी येथील रेसकोर्स ताब्यात घेऊ इच्छित आहे. असं मला ऐकायला मिळतंय. शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न असून ज्यामुळे काही जागा रेसिंगसाठी दिली जाईल आणि बाकीची जागा तथाकथित विकासासाठी काढून घेतली जाईल.’, असे आदित्य ठाकरे म्हणाले तर व्यवस्थापन अशा जमिनी बळकावणाच्या कृत्यांविरोधात उभे राहिल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
