बच्चू कडू यांचा प्रश्न आणि आदित्य ठाकरे यांचं लग्न, देवेंद्र फडणवीस मश्किलपणे म्हणाले…
VIDEO | विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची चर्चा, देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरखळीला आदित्य ठाकरे यांनी काय केला पटलवार?
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस आहे सभागृहात विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली असून यावेळी अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक कामगारांच्या समस्येवरून सभागृहात प्रश्न उपस्थित केला. राज्याच्या राजकारणात अतिशय टोकाच्या टीका टिप्पण्यांनी, वैयक्तिक आरोपांमुळे वातावरण गढूळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आज विधानसभेत रंगलेल्या काही विनोदांनी हे वातावरण थोडसं हलकं झाल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळात बच्चू कडू यांनी प्रकल्प बंद झाल्यामुळे कामगार रस्त्यावर येत आहे असा विषय मांडताना आधी लग्न जमलं आणि तुटलं त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बच्चू कडू यांनी लग्नाचा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून का विचारला होता यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. विधिमंडळात झालेल्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाच्या विषयावरून आदित्य ठाकरे यांना खोचक टोमणा लगावला त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांच्याच खास विनोदी शैलीत पलटवार केल्याचे पाहायला मिळाले, बघा काय म्हणाले आदित्य ठाकरे