आरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो 3’चं कारशेड आरेतच उभारण्याची घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने हा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
“आमच्यावर जो राग आहे, तो मुंबईवर काढू नका. मुंबईला तरी धोका देऊ नका, आम्हाला दिलं ते खूप झालं. सरकारचा पहिला निर्णय हा मुंबईवर घाला घालणारा नसू शकतो, मुंबईचा धोका नसू शकतो. माझी हीच विनंती आहे की मुंबईकरांचा विचार करा”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो 3’चं कारशेड आरेतच उभारण्याची घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने हा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे.
Published on: Jul 03, 2022 01:30 PM
Latest Videos