मुंबईकरांनो तुमच्या आयुष्याची किंमत राहिलेली नाही - नितेश राणे

मुंबईकरांनो तुमच्या आयुष्याची किंमत राहिलेली नाही – नितेश राणे

| Updated on: Dec 07, 2021 | 1:11 PM

वरळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

मुंबई : वरळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा. नंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे.

Published on: Dec 07, 2021 01:11 PM