काकूकडून पुतण्याची पाठराखण… दिशा सालियान प्रकरणात शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मला नाही वाटत….
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. यावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिल ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या प्रकरणावर प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे यांनी पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात आता दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. तर पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल या प्रकरणाचा तपास करणार आहे. यासह मालवणी पोलीस ठाण्याचे सीनिअर पीआय चिमाजी आढाव तपास करणार आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. यावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिल ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या प्रकरणावर प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे यांनी पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल….चौकश्या तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय’ असं थेट भाष्य त्यांनी केलंय.