द्रौपदी मुर्मूंवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..

द्रौपदी मुर्मूंवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..

| Updated on: Jul 18, 2022 | 1:43 PM

देशाच्या सोळाव्या राष्ट्रपतीपदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे.

देशाच्या सोळाव्या राष्ट्रपतीपदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असून देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या 25 तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हे आधीच जाहीर केलं होतं की जरी कुठल्याही पक्षासोबत आमचे वैचारिक किंवा राजकीय मतभेद असतील तरीदेखील एक महिला, ज्या आदिवासी समाजातल्या आहेत, राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जेव्हा पुढे आल्या तेव्हा त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं. त्यानुसारच आज आम्ही मतदान केलं आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.