साताऱ्यात प्रशासनाकडून मोठी कारवाई, 16 गुडांच्या घरावर हातोडा
सातारा येथील प्रतापसिंह नगर येथील अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या 16 घरांवर जिल्हा प्रशासनाकडून हातोडा चालवण्यात आला आहे. प्रतापसिंह नगर येथील गुंड दत्ता जाधव, युवराज जाधव लल्लन जाधव यांच्याघरावर सातारा जिल्हा प्रशासनाने केली कारवाई
साताऱ्यात प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सातारा येथील प्रतापसिंह नगर येथील अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या 16 घरांवर जिल्हा प्रशासनाकडून हातोडा चालवण्यात आला आहे. प्रतापसिंह नगर येथील गुंड दत्ता जाधव, युवराज जाधव लल्लन जाधव यांच्याघरावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. तर या गुडांसह इतर गुंडांच्या 16 घरांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत अनधिकृत घर जिल्हा प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरू असताना प्रतापसिंह नगर येथील परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई करण्यात आलेल्या संबंधित गुंडांवर दरोडा, बलात्कार, खून,घरफोडीसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Published on: Mar 27, 2024 05:16 PM
Latest Videos