नाना पटोले यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल कराः चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोले यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल कराः चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Jan 30, 2022 | 8:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

नटवरलाल नाना पटोले (Nana Patole) यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर नागपूरच्या (Nagpur) मेंटल हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार करण्याची गरज असल्याची टीका भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नाना पटोले हे जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या वर टीका करताना पटोले यांचा नटवरलाल असाही उल्लेख त्यांनी केला.