Gunratna Sadavarte | 22 डिसेंबरला विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य करावा हीच आमची अपेक्षा

| Updated on: Dec 20, 2021 | 7:18 PM

आम्ही कोर्टाला डंके की चोटवर सांगितलं. म्हणून कोर्टाने यावर 22 तारखेला सुनावणी ठेवली आहे. या 54 मृत्यूनंतर तरी त्यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव घेऊन यावा. त्यांनी वेळकाढूपणा करू नये, असं सदावर्ते म्हणाले.

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे संपावर तोडगा काढत नाहीत. केवळ अल्टिमेटम देत आहेत, असं सांगतानाच आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या 54 मृत्यूवर डान्स करत आहे. त्यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव आणावा, असं अॅड. गुणरत्न यांनी सांगितलं. आज एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीनंतर त्यांनी मीडियाशी बोलताना आघाडी सरकारवर टीका केली. सरकारचा रिपोर्ट शिळ्या कढीला ऊत आणणारा आहे. तोही आम्हाला दिला जात नव्हता. प्राथमिक अहवाल कोर्टाचा अवमान करणारा आहे. 54 मृत्यूवर सरकार डान्स करत आहे. आम्ही कोर्टाला डंके की चोटवर सांगितलं. म्हणून कोर्टाने यावर 22 तारखेला सुनावणी ठेवली आहे. या 54 मृत्यूनंतर तरी त्यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव घेऊन यावा. त्यांनी वेळकाढूपणा करू नये, असं सदावर्ते म्हणाले.