‘गुजरले ते गुजरले’; Ajay Gujar यांच्यावर Gunaratna Sadavarte यांची मोजक्या शब्दात टीका

| Updated on: Jan 10, 2022 | 7:24 PM

एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजय गुजर यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांचं वकिलपत्र काढून घेतल्याची घोषणा केली. त्यावर सदावर्ते यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर तुमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करु, असं आश्वासनही यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आलं. तसंच एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजय गुजर यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांचं वकिलपत्र काढून घेतल्याची घोषणा केली. त्यावर सदावर्ते यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.