Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी !
इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज किला कोर्टात (court) हजर केले असता त्यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले.
Published on: Apr 09, 2022 05:58 PM
Latest Videos