Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते आमरण उपोषण करणार? पण कोणत्या मागणीसाठी?
VIDEO | वकील गुणरत्न सदावर्ते हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पिल्लू असल्याची टीका मराठा समाजातून होत आहे. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | वकील गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पिल्लू असल्याची टीका मराठा समाजातून होत आहे. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. नंतर ते आरक्षण गेलं. जरांगे यांच्यासारखी माणसे काय बोलू शकतात, पॉलिटिकल बॉसेससाठी जगणारी ही माणसं असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. माझा कुणाला, कोणत्याही जातीला विरोध नाही पण चार आयोगानं नाकारलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण मिळू शकत नाही. शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांचे पॉलिटिकल बॉस आहेत. आहेत. शरद पवार जसं बोलतात तसं ते करतात. शरद पवारांच्या भूमिकेवर जरांगे बोलतात. सरकारने मराठा आरक्षण दिलं तर आमचा विरोध असेल असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हणत टीका केली आहे तर खुल्या गुणवतांच्या आरक्षणाला धक्का लागला तर उपोषण करणार असल्याचा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय.