विदर्भाच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा, म्हणाले, ‘विदर्भाच्या आड याल तर…’
VIDEO | 'विदर्भाचा बुलंद आवाज' या परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विदर्भाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी काय दिला गर्भित इशारा, बघा व्हिडीओ
यवतमाळ, २९ सप्टेंबर २०२३ | गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाच्या मागणी सूरू आहे. मात्र आता वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही. परिणामी याला विरोध करणाऱ्याला या विदर्भाच्या भूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. ‘विदर्भाचा बुलंद आवाज’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा या परिषदेतून गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही स्वतंत्र विदर्भासाठी लपंडावाची असल्याची टीकाही यावेळी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांची जीभ घसरली असल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीच्या चार दिवस अगोदर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्न आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न जर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडा घातला तर एकही एसटी कर्मचारी स्टेरींगवर बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.