Gunratna Sadavarte : आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला

Gunratna Sadavarte : आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला

| Updated on: Apr 06, 2025 | 11:10 AM

Gunratna Sadavarte on Raj Thackeray : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मनसेवर टीका करण्यात आली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकीय स्टँडअप कॉमेंटेटर अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकीय स्टँडअप कॉमेंटेटर असा उल्लेख करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या पक्षासारख्या पार्ट्या गल्लोगल्लीत असतात, असं म्हणत सदावर्ते यांनी मनसेवर टीका केली आहे. तसंच राज ठाकरे यांनी मुंबईतल्या मराठी टक्क्याचा अभ्यास करावा, असा सल्ला देखील सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राज ठाकरे यांच्यासारख्या पार्ट्या गल्लोगल्लीत आहे. ते राजकीय स्टँडअप कॉमेंटेटर आहेत. मुंबईत किती लोक मराठी आहेत, किती अमराठी आहेत, याचा अभ्यास राज ठाकरेंनी करावा. किती गुजराती आहेत याचाही अभ्यास करावा, असंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Published on: Apr 06, 2025 11:10 AM