10 महिन्यांनंतर कोर्टाचा निकाल लागला अन् शिंदे-फडणवीस सरकार वाचलं, आता पुढे काय होणार?
VIDEO | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्हीपचं काय होणार? कोणाचा व्हीप लागू होणार?
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर तब्बल 10 महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला अन् शिंदे-फडणवीस सरकार वाचलं घटनापीठाच्या निकालानंतर आता पुढं नेमकं काय होणार आहे? दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंना दिलंय. तर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्हं दिलंय. दोन्ही पक्ष आता वेगवेगळे आहेत. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून गोगावलेंना पुन्हा नव्यानं प्रतोद म्हणून नेमण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. आमदारांचं प्रकरण सुप्रीम कोर्टातून, विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलंय. त्यामुळं नार्वेकरांकडून प्रक्रिया सुरु होईल. अर्थात त्यासाठी किती वेळ लागेल हे तूर्तास सांगता येणार नाही. पण निकालामुळं शिंदेंचं सरकार वाचलं हे नक्की! दरम्यान, घटनापीठानं, व्हीप संदर्भातही महत्वाचं वक्तव्य केलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती कोर्टानं बेकायदेशीर ठरवलीय. तर ठाकरे गटाचे, सुनिल प्रभू यांचा व्हीप लागू होईल असं कोर्टानं म्हटलं. यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले, बघा ….