तब्बल ११ तासांनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, अखेर चौकशी संपली
बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू होती. याकरता रोहित पवार सकाळीच ईडी कार्यालयात दाखल झाले होते आणि आता तब्बल ११ तास चौकशी झाल्यानंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू होती. याकरता रोहित पवार सकाळीच ईडी कार्यालयात दाखल झाले होते आणि आता तब्बल ११ तास चौकशी झाल्यानंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील हजर होते. तर आपली लढाई संपली नसल्याचे म्हणत रोहित पवार यांना पुन्हा १ फ्रेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार म्हणाले, अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्यांनी जी कागदपत्र मागितली आहे. सर्व कागदपत्र घेऊन मी ईडी कार्यालयात दाखल झालो आहे. यापूर्वीही मी हवी ती कागदपत्र दिली आहेत. तर ईडीने मागवलेली सर्व माहिती मी स्वतः देणार असल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं.

बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली

भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'

भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले

आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
