राजन साळवी यांच्या अडचणी वाढणार? ACB चौकशीनंतर पहिला गुन्हा दाखल, काय गंभीर आरोप?
राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील जुन्या घरी, सध्या राहत असलेल्या घरी, हॉटेलमध्ये एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता दाखल झाले आहे आणि त्यांची झाडाझडती सुरू आहे. अशातच दिवसेंदिवस ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसताय.
रत्नागिरी, १८ जानेवारी २०२४ : शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) धाड टाकली. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील जुन्या घरी, सध्या राहत असलेल्या घरी, हॉटेलमध्ये एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता दाखल झाले आहे आणि त्यांची झाडाझडती सुरू आहे. अशातच दिवसेंदिवस ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसताय. एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजन साळवी यांच्या उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. राजन साळवी यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरात एसीबीची टीम आणि १० ते १५ अधिकारी त्यांची चौकशी करत आहे.