नितेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांना लगावला टोला अन् दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, … तुमचा आवडता टिल्लू
VIDEO | अजित पवार यांनी केलेल्या टिकेवर नितेश राणी यांनी कुणाचा दिला दाखला? काय दिलं प्रत्युत्तर? बघा व्हिडीओ
मुंबई : अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली. त्यामुळे संजय राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांची तोंडभरून स्तुती केली आहे. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी अजित पवार यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. यानंतर अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर मिश्कीलपणे टीका केल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून थेट प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यावर नितेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर पार्थ पवार यांचा दाखल दिला आहे.
Published on: Feb 24, 2023 01:58 PM
Latest Videos