अजित पवार सत्तेत सामील; पुत्र पार्थ पाठोपाठ आता पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याची राजकारणात एन्ट्री
तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारे गट तयार झाले आहेत. तर आतापर्यंत अजित पवार गटात ३५ हून अधिक आमदारांनी प्रवेश केला आहे. त्याचदरम्यान नागालँडमध्ये देखील शरद पवार यांना धक्का बसला असून तेथील ७ आमदारांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय.
मुंबई | 22 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारे गट तयार झाले आहेत. तर आतापर्यंत अजित पवार गटात ३५ हून अधिक आमदारांनी प्रवेश केला आहे. त्याचदरम्यान नागालँडमध्ये देखील शरद पवार यांना धक्का बसला असून तेथील ७ आमदारांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे शरद पवार यांची पक्षावरच पकट आता ढिली होत असल्याचे समोर येत असताना अजित पवार यांची ताकद वाढत आहे. याचदरम्यान त्यांना आता कुटुंबातील आणखी एका सदस्याचा हातभार लागणार आहे. आता पार्थ पवार पाठोपाठ पवार कुटुंबातील आणखी एक सदस्याची राजकारणात एन्ट्री होणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पार्थ पवार हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पाठोपाठ धाकटे चिरंजीव जय पवार यांची राजकारणात एंट्री झाल्याची पहायला मिळत आहे. मुंबई सचिव गणेश आडिवरेकर यांनी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये जय पवार यांचा फोटो पहायला मिळत आहे. तर हे होर्डिंग्ज अजित पवार यांचा उद्या वाढदिवस निमित्त लावण्यात आला आहे.