'मोदीजी को एक कमल यहाँ से...', शाहांकडून संकेत, भागवत कराड यांना तिकीटाचे वेध?

‘मोदीजी को एक कमल यहाँ से…’, शाहांकडून संकेत, भागवत कराड यांना तिकीटाचे वेध?

| Updated on: Mar 07, 2024 | 12:13 PM

संभाजीनगरचा उमेदवार कोणत्या पक्षाचा ? महायुतीतील शिंदेंसह भाजपही इच्छुक असली तरी यंदा लोकसभेची लढत ही तिरंगी असणार की चौरंगी याचीही उत्सुकता आहे. अमित शाह यांनी केलेल्या विधानानंतर संभाजीनगरची जागा कमळ अर्थात महायुतीतून भाजपचं लढणार का?

मुंबई, ७ मार्च २०२४ : लोकसभेच्या अधिकृत घोषणेच्यापूर्वीच महायुतीतून संभाजीनगरचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. अमित शाह यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट संकेत दिलेत. महायुतीतील शिंदेंसह भाजपही इच्छुक असली तरी यंदा लोकसभेची लढत ही तिरंगी असणार की चौरंगी याचीही उत्सुकता आहे. अमित शाह यांनी केलेल्या विधानानंतर संभाजीनगरची जागा कमळ अर्थात महायुतीतून भाजपचं लढणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतून शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे आणि भाजपचे खासदार भागवत कराड हे दोन्ही इच्छुक आहे. याबाबत दोघांनीही जाहीरपणे विधानं केली आहेत. मात्र अमित शाह यांनी घेतलेल्या सभेत मोदीजी को एक कमल यहॉ से भेजेंगे….अमित शाह यांच्या या वक्तव्याने संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असणार याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 07, 2024 12:12 PM