अमोल मिटकरी राष्ट्रवादीत एकटे पडले? मनसेकडून खुलेआम धमकी अन् हल्ला तरी अजित पवार यांचा गट शांत?

अमोल मिटकरी राष्ट्रवादीत एकटे पडले? मनसेकडून खुलेआम धमकी अन् हल्ला तरी अजित पवार यांचा गट शांत?

| Updated on: Aug 02, 2024 | 10:37 AM

मनसेच्या हल्ल्यानंतर आपल्याच पक्षातील नेते गप्प का? असा प्रश्नच अमोल मिटकरी यांनी केलाय. हल्लेखोरांवर कारवाई करा, म्हणून अमोल मिटकरी आपल्या लेकीसह अकोला पोलीस स्टेशन अधिक्षकांच्या कार्यालयाबाहेर बसले आहे. मनसे नेते खुले आम धमकी देत असताना पोलीस काय करताय? असा सवाल करत आक्रमक

अमोल मिटकरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एकाकी पडले का? असा सवाल सध्या केला जात आहे. कारण मनसेच्या हल्ल्यानंतर आपल्याच पक्षातील नेते गप्प का? असा प्रश्नच अमोल मिटकरी यांनी केलाय. हल्लेखोरांवर कारवाई करा, म्हणून अमोल मिटकरी आपल्या लेकीसह अकोला पोलीस स्टेशन अधिक्षकांच्या कार्यालयाबाहेर बसले आहे. पोलीस खात्यावरही अमोल मिटकरी यांनी यावेळी सवाल उपस्थित केलेत. मनसे नेते खुले आम धमकी देत असताना पोलीस काय करताय? असे म्हणत अमोल मिटकरी आक्रमक झालेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंवर मी बोललो तर त्यांचे समर्थक अंगावर आलेत मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कुणीच का बोलत नाही? असा प्रश्नही मिटकरी यांनी विचारलाय. अजित पवार पुण्यात नसतानाही खडकवासला धऱणातून पाणी सोडलं गेलं, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पुण्यात केलं. यानंतर राज ठाकरे हे सुपारीबहाद्दर आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. बघा नेमका वाद कधी आणि कुठून सुरू झाला?

Published on: Aug 02, 2024 10:37 AM