Special Report | Anil Deshmukh यांच्यानंतर Thackeray सरकारचे आणखी एक मंत्री जेलमध्ये

| Updated on: Mar 07, 2022 | 9:30 PM

नवाब मलिक यांना मनी  लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्ड दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्याच्या आरोपाखाली ईडीने 23 फेब्रुवारीला सकाळी अटक केली होती. आरोप आहे की, मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकरकडून बाजार मूल्यापेक्षा कमी दराने मालमत्ता खरेदी केली होती.

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत  झाली आहे. आज मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. म्हणून 21 मार्चपर्यंत नवाब मलिक यांना भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगात पाठविण्यात आले. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष  न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी हा आदेश दिला आहे. नवाब मलिक यांना मनी  लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्ड दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्याच्या आरोपाखाली ईडीने 23 फेब्रुवारीला सकाळी अटक केली होती. आरोप आहे की, मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकरकडून बाजार मूल्यापेक्षा कमी दराने मालमत्ता खरेदी केली होती. आज झालेल्या सुनावणी वेळी मात्र ईडीने मलिक यांची ईडी कोठडी मागितली नाही.