लोकसभेतील 'त्या' घटनेनंतर फडणवीस यांचा पोलीस महासंचालकांना फोन अन् दिले 'हे' आदेश

लोकसभेतील ‘त्या’ घटनेनंतर फडणवीस यांचा पोलीस महासंचालकांना फोन अन् दिले ‘हे’ आदेश

| Updated on: Dec 13, 2023 | 4:40 PM

लोकसभेतील घटनेनंतर संसदेत एकच भितीची वातावरण पाहायला मिळाले. या गोंधळामुळे संसदेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतील या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना थेट फोन केला

 मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : संसदेचं अधिवेशन सुरु असताना आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. संसदेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन व्यक्तींनी संसद परिसरात एकच गोंधळ घातला. या दोघांनी संसदेत शिरकाव करण्यापूर्वी संसदेबाहेर फटाके फोडले आणि तानाशाही नही चलेगी अशा घोषणा दिल्या. त्यानंतर दोघेही लोकसभेत शिरले आणि प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. या घडलेल्या घटनेने अवघ्या भारताला हादरवून टाकलं आहे. त्यांनी लोकसभेच्या सभागृहातील खासदारांचं लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅडलचा वापर केला. या कँडलचा त्यांनी सर्वत्र धूर केला. त्यामुळे सभागृहात काहीवेळ पिवळा धूर पसरल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर संसदेत एकच भितीची वातावरण पाहायला मिळाले. या गोंधळामुळे संसदेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतील या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना थेट फोन केला आणि महाराष्ट्रातील ज्या युवकांचा सहभाग हा हल्ला घडवून आणण्यात होता त्याची माहिती घेण्याचे आदेश दिलेत.

Published on: Dec 13, 2023 04:39 PM