#DevachaNyay : देशभरात पहिल्या क्रमांकावर ‘देवाचा न्याय’… ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. अशातच आज ट्विटरवर वाचा न्याय हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणानंतर सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय. अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणानंतर ट्विटरवर देवाचा न्याय हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. तर देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. देवाचा न्याय या हॅशटॅगच्या बरोबरीने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाची चांगलीच चर्चा होतेय. १२ आणि १३ ऑगस्टला बदलापूर येथील शाळेत साडे ३ वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आणि राज्यात एकच संतापाची लाट उसळली. लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी २२ वर्षीय अक्षय शिंदेकडून या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घडलेल्या प्रकरणानंतर राज्यभरात निषेध मोर्चे काढण्यात आले. तर बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. यामुळे कर्जत-कल्याणदरम्यानची सेवा बऱ्याच तासाभरापासून ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले होते.