सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षपदी, आता कुणाला रिपोर्टिंग करणार? थेट घेतलं ‘या’ नेत्यांचं नाव
VIDEO | राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची दिली उत्तरे
पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. पक्षात वरिष्ठ नेते असताना सुप्रिया सुळे आता कुणाला रिपोर्टिंग करणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला आहे. दरम्यान होत असलेल्या या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी स्वतः पूर्णविराम दिलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित दादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार. मी महाराष्ट्राची प्रभारी आहे म्हणजे दडपशाही नाही. हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. विशिष्ट रिपोर्टिंग सिस्टम असायला हे टीव्हीचं चॅनल नाही.हा पक्ष आहे. आम्ही सेवा करायला आलो आहे. त्यामुळे रिपोर्टिंगचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल उपस्थित केला आहे.