आम्ही अभियान उघडणार, प्रसाद लाडांनंतर जरांगे पाटील आणि प्रवीण दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर, काय दिला इशारा?

आम्ही अभियान उघडणार, प्रसाद लाडांनंतर जरांगे पाटील आणि प्रवीण दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर, काय दिला इशारा?

| Updated on: Jul 22, 2024 | 11:09 AM

प्रसिद्धीसाठी मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे. आता त्यांच्या विरोधात अभियान करू, असा इशाराच दरेकर यांनी दिला असून त्यांना पाठबळ दिलं पण आता मनोज जरांगे पाटील यांचा भंपकपणा जनतेसमोर आणू, असंच दरेकर यांनी म्हटलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

भाजपचे प्रसाद लाड यांच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आणि प्रविण दरेकर यांच्यात शाब्दिक वॉर रंगलं आहे. प्रसिद्धीसाठी मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे. आता त्यांच्या विरोधात अभियान करू, असा इशाराच दरेकर यांनी दिला असून त्यांना पाठबळ दिलं पण आता मनोज जरांगे पाटील यांचा भंपकपणा जनतेसमोर आणू, असंच दरेकर यांनी म्हटलं आहे. एकीकडे भाजप सत्तेत आल्यानंतर निघणारे मराठ्याचे मोर्चे म्हणजे विरोधकांचा हात असल्याचे विरोधक सांगतात. मात्र मराठ्यांच्या मोर्च्याच्या पडद्यामागून आपणच काम करत होतो असा दावा, भाजपचे प्रवीण दरेकर यांनी केलाय. मराठ्यांना आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातच मनोज जरांगे पाटील का बोलतात? असा सवालच प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार काय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 22, 2024 11:09 AM