मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता 'हा' पक्षही करणार अयोध्येचा दौरा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता ‘हा’ पक्षही करणार अयोध्येचा दौरा?

| Updated on: Apr 08, 2023 | 10:12 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर असताना 'या' नेत्यानं म्हटलं, 'आम्ही सुध्दा अयोध्येला जाणार आहोत

गोंदिया : राज्यात एकीकडे कोरोना, अवकाळी पावसाचे संकट चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा काढला आहे. यावरून राज्यातील जनतेची त्यांना किती काळजी आहे हेच त्यावरून दिसून येतं अशा शब्दात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री जरी अयोध्येला गेले असले तरी त्यात विशेष काय नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तरीही ते अयोध्येला जाणार आहेत. मात्र ज्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दौरा अयोध्या दौरा काढला आहे, त्याच प्रमाणे आम्ही पण अयोध्येला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले आहेत. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देत त्यामध्ये नवीन काय म्हणत म्हणाले राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या मालाला भाव मिळत नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा अयोध्येला जाणं हे त्यांना महत्वाचं वाटतं या शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Published on: Apr 08, 2023 10:10 PM