आदित्य ठाकरे यांच्याकडून खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या शिरसाट यांचा खरपूर समाचार; म्हणाले, ‘अशा सडक्या’
यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी, प्रियंका चतुर्वेदीला सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी खासदारकीचं तिकीट दिलं असे चंद्रकांत खैरे म्हणाले होते.
मुंबई, 30 जुलै, 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर काल ठाण्यातील मेळाव्यातून जोरदार तोफ डागली होती. त्यानंतर आज भाजपसह शिंदे गटाकडून टीका करण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी, प्रियंका चतुर्वेदीला सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी खासदारकीचं तिकीट दिलं असे चंद्रकांत खैरे म्हणाले होते. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तर यावरून आदित्य ठाकरे यांनी थेट शिरसाट यांचा समाचार घेत टीका केली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी, अशा गद्दार आमदारांची किंमत त्यांना कळली आहे. तर सडक्या विचारांचे लोक राजकारणात कसे टिकले? असा प्रश्न पडतो. तर याचं दु:ख देखील होतं. पण, आता जनताच त्यांना जागा दाखवेल असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 30, 2023 01:04 PM
Latest Videos