दादांच्या गुलाबी जॅकेटनंतर 'गुलाबी रिक्षा'ची चर्चा, काय आहे योजना? तुम्हालाही घेता येणार लाभ?

दादांच्या गुलाबी जॅकेटनंतर ‘गुलाबी रिक्षा’ची चर्चा, काय आहे योजना? तुम्हालाही घेता येणार लाभ?

| Updated on: Jul 23, 2024 | 10:28 AM

राज्यात गुलाबी जॅकेटची चर्चा असताना आता चर्चा सुरू झाली आहे ती गुलाबी रिक्षाची...राज्यातील गरीब महिलांना रोजगार मिळावा यासाठी अजित पवार यांनी गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली. कोणत्या शहरात किती महिलांना गुलाबी रिक्षा मिळणार? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट आणि पक्षाच्या गुलाबी रंग रुपाची चांगलीच चर्चा सुरू आहे. राज्यात गुलाबी जॅकेटची चर्चा असताना आता चर्चा सुरू झाली आहे ती गुलाबी रिक्षाची…राज्यातील गरीब महिलांना रोजगार मिळावा यासाठी अजित पवार यांनी गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली. राज्यातील १७ शहरांमधील १० हजार महिलांना गुलाबी रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. गुलाबी रिक्षा चालवण्यासाठी महिलांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार, रिक्षा खरेदी करण्यासाठी १० टक्के रक्कम महिलांना भरावी लागणार आहे तर रिक्षा खरेदी करण्यासाठी २० टक्के रक्कम सरकार भरणार असून उर्वरित ७० टक्के रकमेसाठी बँकेचे कर्ज मिळणार आहे. कोणत्या शहरात किती महिलांना गुलाबी रिक्षा मिळणार? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 23, 2024 10:28 AM