ईडी कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी घेतला मोठा निर्णय, चौकशीबाबत केलं महत्त्वाचं वक्तव्य
VIDEO | ईडीकडून सातत्याने सुरु असलेल्या कारवाईनंतर मुश्रीफांनी ईडी चौकशीबाबत काय घेतला निर्णय प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया
मुंबई : नेते हसन मुश्रीफ यांना ईडी कार्यालयाने काल चौकशीसाठी येण्याबाबत समन्स दिले होते, तर यासंदर्भात वेळ वाढवून द्यावा, अशी मागणीही ईडी कार्यालयाकडे केल्याचे हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईडीवर आरोप करण्यात आले होते. त्यांच्या या याचिकेवर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून सुरक्षा दिली आणि त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे अटक करु नये, असे कोर्टाकडून आदेश दिले आहेत. त्यानंतर आता हसन मुश्रीफ ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले आहे. तर मला ईडी अधिकाऱ्यांनी उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानुसार मी उद्या विधिमंडळाचं कामकाज आटोपून इथे ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.