असा जल्लोष कधी पाहिलाय? जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद ‘या’ आमदारानं चिखलात लोळून लुटला
विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव केल्यानंतर चिखलात कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा करणार, असा शब्द अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दय सामंत यांना दिला होता अन्...
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार निवडून आले. फक्त महाविकास आघाडीचा एक उमेदवार जयंत पाटील हा पडला. मविआकडून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडून आल्या. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव केल्यानंतर चिखलात कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा करणार, असा शब्द अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना दिला होता. यानंतर जयंत पाटील यांचा पराभव केल्यानंतर चिखलात कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा करणार असल्याचा शब्द आज आमदार महेंद्र दळवी यांनी पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत अलिबाग येथे शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवाचा आनंद चिखलात खेळून लुटला आहे. बघा व्हिडीओ.