राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती; यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती; यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स

| Updated on: Jan 25, 2023 | 8:35 AM

'मविआ'च्या काळात मला अटक करण्याचा कट रचला होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप...यासह जाणून घ्या दिवसभरातील बातम्या...

राज्यतील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यानंतर दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात मला अटक करण्याचा कट रचला होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांना वरिष्ठांचा आदेश आल्याचाही त्यांनी दावा केला. तर देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची कोणतीही योजना नव्हती, असे म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

जनतेचे मुळ मुद्दे दुर्लक्षित करण्यासाठी हा प्रयत्न होत असून देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, विनायक राऊत यांच्यासह नाना पटोले यांनी टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरे यांची भूमिका जाणून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी…

Published on: Jan 25, 2023 08:33 AM