महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांची धावाधाव; अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न
तर भिडे यांच्या त्या वक्तव्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि इतर संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर अमरावतीत काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जोरदार आंदोलन करून गुन्हा दाखल करण्यासह भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती.
मुंबई, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला होता. तर भिडे यांच्या त्या वक्तव्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि इतर संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर अमरावतीत काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जोरदार आंदोलन करून गुन्हा दाखल करण्यासह भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता संभाजी भिडे यांच्या अटकपूर्व जामीनासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. तर कार्यकर्त्यांकडून सध्या वकिलाचा शोध घेतला जात असल्याचीही माहिती मिळत आहे.