गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा, काय आहे प्रकरण?
सात वर्षांपासून विमान घोटाळ्यात प्रफुल्ल पटेलांवर जे आरोप झाले होते, त्या प्रकरणात कोणतेही पुरावे न मिळाल्याने सीबीआयने केस बंद केली. तसा रिपोर्ट देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलाय. यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भाजपवरून टीका केली
शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना दिलासा मिळाल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सात वर्षांपासून विमान घोटाळ्यात प्रफुल्ल पटेलांवर जे आरोप झाले होते, त्या प्रकरणात कोणतेही पुरावे न मिळाल्याने सीबीआयने केस बंद केली. तसा रिपोर्ट देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलाय. यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भाजपवरून टीका केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून दिलासा मिळालाय. ७ वर्षापूर्वींच्या एका प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर करत कोर्टाला अहवाल दिलाय. यूपीएचं सरकार असताना प्रफुल्ल पटेल विमान वाहतूक मंत्री होते. खासगी विमान कंपन्यांशी बेकायदेशीर करार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाले होते. २०१७ मध्ये या आरोपावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ज्यात बेकायदेशीर करारांमुळे सरकारचं ८४० कोटींच्या नुकसानीचा आरोप करण्यात आला. बघा यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट…