हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, मुंबईच्या कॉलेज प्रशासनाचा नवा नियम काय?
हिजाबनंतर आता जीन्स, टी-शर्टवर बंदी घालण्यात आली आहे. कॉलेज प्रशासनाच्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तर कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. यापूर्वी महाविद्यालय प्रशासनाने हिजाबवर बंदी घातली आता जीन्स, टी-शर्ट बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील चेंबूरमध्ये असणाऱ्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये हिजाबनंतर आता जीन्स, टी-शर्टवर बंदी घालण्यात आली आहे. कॉलेज प्रशासनाच्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तर कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. यापूर्वी महाविद्यालय प्रशासनाने हिजाबवर बंदी घातली असताना या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती याचिका न्यायालयाने फेटाळली यानंतर कॉलेजकडून नवा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील या महाविद्यालयाच्या प्रशासनाने 27 जून रोजी जारी केलेल्या ड्रेस कोड आणि इतर नियमानुसार फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, उघडे कपडे आणि जर्सीला परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये फॉर्मल आणि सभ्य पोशाख परिधान करावं असं म्हटले आहे.