आव्हाडांनंतर आता प्रभू रामाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, राम आणि सीता…
ज्येष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्रीराम आणि रामायणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
जळगाव, १८ जानेवारी २०२४ : २२ जानेवारीला अवघे काही तास शिल्लक आहेत. येत्या २२ तारखेला अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य अशा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. अशातच ज्येष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्रीराम आणि रामायणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक रामायणांमध्ये राम वेगळा आहे. एका रामायणात तर चक्क राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. वाल्मिकीचा राम कशामुळे खरा म्हणायचा? वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसं रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं. तसेच राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? ते खोलात जावून शोधलं पाहिजे. एका रामायणात तर सीता ही रामाला अक्कल नाही, अशा शिव्या देते, असं वक्तव्य करत भालचंद्र नेमाडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. खरा कोणता राम म्हणायचा, वाल्मिकी राम खरा म्हणायचा? वाल्मिकीच्या आधी मी आसाममध्ये एका समूदायाचं रामायण पाहिलं. त्या समूदायाचे आता १५ हजार लोकं राहिले आहेत. त्यांच्यातला राम वेगळा. त्यांच्यात सीता मुख्य, ती रामाला आज्ञा देत असते, रामाला शिव्या देत असते, असं भाष्य त्यांनी केले आहे.