फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात, बघा काय म्हटलंय त्यात?

फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात, बघा काय म्हटलंय त्यात?

| Updated on: Feb 28, 2024 | 5:01 PM

जरांगेंच्या आरोपांवरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत फडणवीसांनी मुख्यमंत्री असतान मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केल्याचे म्हटले. इतकंच नाहीतर मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय-काय केलं याची भली मोठी यादीच भाजपकडून जाहिरातीच्या स्वरूपात दैनिकातून प्रसिद्ध करण्यात आली

मुंबई, २८ फेब्रवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत अनेक गंभीर आरोप केलेत. फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. जरांगेंच्या आरोपांवरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत फडणवीसांनी मुख्यमंत्री असतान मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केल्याचे म्हटले. इतकंच नाहीतर मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय-काय केलं याची भली मोठी यादीच भाजपकडून जाहिरातीच्या स्वरूपात दैनिकातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. जरांगेंनी केलेल्या फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपाकडून फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं याची पानभर दैनिकात जाहिरात देण्यात आली आहे. खास करून मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील दैनिकांनाही जाहिरात देण्यात आली आहे. यात मराठा समाजाची किती पद भरली, सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळाची स्थापना केली यासह अन्य योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Published on: Feb 28, 2024 05:01 PM