Sanjay Raut : नितीश कुमार आणि चंद्राबाबू उद्या आमच्यासोबत असतील, संजय राऊतांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चा
'आता मोदी काय करतील ? अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा सुरु आहे. त्यांना सरकार बनवायचं आहे बनवू द्या. पण मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही. मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सर्वांनी मिळून....', संजय राऊत यांची मोदी आणि भाजपवर सडकून टीका, बघा व्हिडीओ
एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी हे सरकार चालवताना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येतील, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. एनडीए कुठे आहे? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का? हे दोघं तर सगळ्यांचेच आहेत. आज ते तुमच्यासोबत आहेत तर उद्या आमच्यासोबत असतील, असं म्हणत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला. सरकार स्थापनेच्या आधीच अग्निवीर योजनेला विरोध झाला आहे, उद्या इतर योजनांनाही ते विरोध करू शकतील. चंद्राबाबू नायडू हे मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. आता मोदी काय करतील ? अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा सुरु आहे. त्यांना सरकार बनवायचं आहे बनवू द्या. पण मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही. मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप केलं आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.