सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'त्या' शपथेचा आदर पण...जरांगे पाटलांचा निर्धार कायम

सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ‘त्या’ शपथेचा आदर पण…जरांगे पाटलांचा निर्धार कायम

| Updated on: Oct 25, 2023 | 10:58 AM

VIDEO | मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम कालच संपला आहे. मात्र आरक्षणासाठी अधिकचा वेळ सरकारला देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिलाय.

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री यांनी दसरा मेळाव्यातून मराठ्याना टिकणारं आरक्षण देऊ असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढं नतमस्तक होत शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. मराठा आरक्षणासाठी अधिकचा वेळ सरकारला देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिलाय. तर मराठा आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर सरकारकडून कोणताही निर्णय न आल्याने जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील म्हणाले, ‘सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिला आणि त्यांचा सन्मान आम्ही केला आता सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन आमचा सन्मान करावा. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो ते पाळतात, अशी मराठ्याची भावना आहे. त्यांनी या शब्दाला खरं करावं, शपथ घेतली असेल तर चांगलंय पण आता आम्ही आंदोलन थांबवणार नाही.’

Published on: Oct 25, 2023 10:58 AM