PDCC Election Results | प्रदीप कंदच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून NCP ला डिवचणारी घोषणाबाजी

PDCC Election Results | प्रदीप कंदच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून NCP ला डिवचणारी घोषणाबाजी

| Updated on: Jan 04, 2022 | 3:15 PM

प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली.

प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुणे जिल्हा सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीतील सात पैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अजितदादांचं वर्चस्व राहिलं असलं तरी एक जागा गमावल्याचं त्यांना शल्य बोचत आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना पराभूत करण्याचं आवाहन पवार यांनी केलं होतं. त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पण तरीही कंद यांनी लिलया विजय मिळवून अजितदादांचे मनसुबे उधळून लावले आहेत.